Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीLalbaug Accident : लालबाग परिसरात पुन्हा अपघात! महिलेला बेस्ट बसची जोरदार धडक;...

Lalbaug Accident : लालबाग परिसरात पुन्हा अपघात! महिलेला बेस्ट बसची जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

मुंबई : मागील आठवड्यात मुंबईतील लालबाग परिसरात (Lalbaug Accident) बेस्ट बसचा भीषण अपघात (Best Bus Accident) झाल्याची घटना घडली होती. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला होता. तर ८ जण गंभीर जखमी झाले होते. एका मद्यधुंद प्रवाशासोबत झालेल्या बाचाबाचीमुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसने अनेक वाहनांना धडक देत ९ जणांना चिरडले होते. लालबागमधील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग परिसरातील गणेशगल्ली (Ganeshgalli) येथे एका बेस्ट बसने महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे ५ वाजून ३० मिनिट वाजेच्या दरम्यान बाप्पाच्या दर्शनसाठी आलेल्या या महिलाला बेस्टच्या बसने आधी धडक दिली. धक्का लागल्यामुळे महिला पडली व तिच्या पायावरुन बस गेली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर गणेशभक्तांसह इतर नागरिकांनी बस रोखून धरली आणि चालकाला चांगलाच चाप दिला.

दरम्यान, काल देखील गोरेगावमध्ये बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या घटनेत एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बेस्ट बसच्या वाढत्या अपघातामुळे नागरिकांकडून बेस्ट प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -