Friday, July 4, 2025

Pune Vande Bharat Express : पुणेकरांच्या सेवेसाठी वंदे भारत एक्सप्रेस सज्ज! 'या' तारखेपासून होणार सुरु

Pune Vande Bharat Express : पुणेकरांच्या सेवेसाठी वंदे भारत एक्सप्रेस सज्ज! 'या' तारखेपासून होणार सुरु

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशभरात अनेक मार्गांवरुन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेसचा सुपरफास्ट प्रवास पाहता पुणेकरांनी देखील वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली होती. ही मागणी अखेर पूर्ण झाली असून लवकरच पुण्यातही वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास सुरु होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १५ सप्टेंबरपासून हुबळी-पुणे आणि पुणे-हुबळी या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांचा सांगलीपर्यंतचा तासाभरात पार शक्य होणार आहे. याआधी पुणे ते सांगली प्रवासादरम्यान तीन तास लागत होते. मात्र वंदे भारतमुळे हा प्रवास अवघ्या ५५ मिनिटांतच पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या वेळीची चांगलीच बचत होणार आहे.



कसं असेल वेळापत्रक?


हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस हुबळीहून पहाटे पाच वाजता सुटणार आहे. ती बेळगावला सहा वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. मिरजेला सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांनी, सांगलीमध्ये सकाळी साडेनऊ वाजता आणि सातारा येथे १० वाजून ३५ मिनिटांनी दाखल होईल. पुण्यात दुपारी दीड वाजता गाडी पोहोचेल. पुण्याहून हुबळीला जाणारी गाडी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल. सांगलीत सहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल, तर हुबळीत ही गाडी रात्री पावणे अकरा वाजता पोहोचेल.



या मार्गांवरही धावणार नवीन वंदे भारत ट्रेन



  • टाटानगर - पाटणा वंदे

  • वाराणसी - देवघर वंदे

  • टाटानगर-ब्रह्मपूर वंदे

  • रांची-गोड्डा

  • आग्रा-बनारस

  • हावडा-गया

  • हावडा-भागलपूर

  • दुर्ग-विशाखापट्टनम

  • हुबळी-सिकंदराबाद

  • पुणे-नागपूर


दरम्यान, या सर्व वंदे भारत एक्सप्रेस १५ सप्टेंबर रोजी सुरु होणार असून झारखंडमधील जमशेदपूर येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत.


Comments
Add Comment