मुंबई : सध्या सिनेसृष्टीत एकेकाळी बॉक्स ऑफिस गाजवणारे काही चित्रपट चित्रपटगृहात पुन्हा रिलीज (Re-Release) झाले आहेत. नुकतेच बॉलिवूडमधील ‘रेहना हे तेरे दिल में’ हा चित्रपट पुन्हा रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्यानंतर आता बॉलिवूड आणि मराठी बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजणारा एक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी पुन्हा येणार आहे.
२०१८ साली बॉलिवूडसह मराठी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ (Tumbbad) चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळाली होती. हा चित्रपट अजूनही चाहत्यांच्या मनात घर करुन बसला आहे. या चित्रपटाच्या दमदार आवाज आणि डिझाईनमुळे चाहत्यांमध्ये हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या १३ सप्टेंबर रोजी तुंबाड चित्रपट चित्रपटगृहामध्ये पुन्हा रिलीज होणार आहे.
दरम्यान, अनिल बर्वे यांनी ‘तुंबाड’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘तुंबाड’ चित्रपटाने ६४ वा फिल्मफेयर ॲवॉर्ड्समध्ये अनेक पुरस्कार जिंकले. त्यानंतर वेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या ७५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात देखील हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच या चित्रपटाची संपूर्ण शूटींग गुहेत करण्यात आली असून निर्मात्यांनी चित्रपटासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा खर्च केला होता.