Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी टळणार; लोकल संदर्भात मोठा निर्णय लागू

Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी टळणार; लोकल संदर्भात मोठा निर्णय लागू

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेगाब्लॉक, तांत्रिक बिघाड अशा कित्येक कारणांमुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे दिसून येते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाकडून अनेक बदल देखील करण्यात येतात. अशातच पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास चांगलीच मदत होणार आहे.

१५ डब्यांची लोकल संख्या वाढणार

मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांचा विस्तारीकरण केले जात आहे. त्याचसोबत आता रेल्वेचे डबे देखील वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी रेल्वे मार्गावरून १२ डब्ब्यांच्या लोकल धावत होत्या, तर आता १५ डब्यांची लोकल पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणार आहे. तसेच रोजच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला १५ डब्यांच्या १९९ फेऱ्या धावत आहेत. मात्र तरीही प्रवाशांची गर्दी आणि हाल होत असल्यामुळे रेल्वे संख्येत वाढ होणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.

Comments
Add Comment