कसं असेल वेळापत्रक?
मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) चाकरमानी बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जातात. चाकरमान्यांची मोठी संख्या पाहता कोकण रेल्वेकडून (Konkan Railway) विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. अशातच दिड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनानंतर काही चाकरमान्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातून गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांचा परतीचा प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची रेल्वे गाड्यांची मागणी आणि त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. पनवेल ते मडगावदरम्यान अतिरिक्त दोन गणशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत.
वेळापत्रक
गाडी क्रमांक ०१४२८ ही विशेष रेल्वेगाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला ती त्याच दिवशी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचणार आहे. ०१४२७ ही गाडी १५ सप्टेंबरला पनवेलहून रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून, मडगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे.