Thursday, May 15, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार!

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार!

जालना : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा केली आहे. जालना येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.


यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी २९ सप्टेंबर रोजी आमरण उपोषण करणार, असा इशारा दिला होता. मात्र आता मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी म्हणजेच येत्या १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment