मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नुकतेच आई-बाबांच्या क्लबमध्ये दाखल झाले आहेत. अभिनेत्री आई बनल्यानंतर तिचे कुटुंबीयही अतिशय खुश आहेत.
दीपिकाने चिमुकल्या परीला जन्म दिला आहे. या गुड न्यूजमुळे तिचे चाहतेही अतिशय खुश आहेत. ही खुशखबर आल्यानंतर प्रत्येकजण दीपिकाच्या बाळाचा झलक पाहण्यासाठी उत्सुक आहे.
तर अनेक जण तिचे नाव सुचवत आहेत. सोशल मीडियावर सर्वच जण दीपिका-रणवीरच्या मुलीचे नाव काय असेल हे ठरवत आहेत. तर अनेकांनी स्वत:च अनेक नावे सुचवली आहेत. युजर्स दीपिका आणि रणवीरचे नाव जोडून अनेक नावे लिहित आहेत.
युजर्स राविका, विरानिका, रूहानी, रादिका, अन्विका, वीरिका, रावि, रिदा अशी अनेक नावे सुचवत आहेत. एका ज्योतिषाचार्याने दिलेल्या माहितीनुसार दीपिकाच्या मुलीने ज्या नक्षत्रात जन्म घेतला आहे त्यानुसार ही सिंह राशीची आहे.
आता दीपिका आणि रणवीर आपल्या बाळाचे काय नाव ठरवतात हे वेळच सांगेल. तोपर्यंत फॅन्स मात्र त्यांच्याकडून नामकरण करतच राहतील.
दीपिका-रणवीरच्या मुलीचा जन्म ८ सप्टेंबरला गणेश चतुर्थीला झाला.