नाशिक : शिंदेगाव येथे आज दुपारी फटाक्यांच्या गोदामाला (Firecrackers Godown) भीषण आग (Fire) लागली असून आगीत गोडावून भस्मसात झाले आहे. यात एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल केले याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरालगत असलेल्या शिंदे गावामध्ये चंद्रकांत शिवलाल विसपुते व गौरव चंद्रकांत विसपुते (रा. देवळाली गाव) यांचे शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाचे गोडाऊन आहे. येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके विसपुते यांनी भरून ठेवले होते. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात कारणावरून आग गोडावूनला लागली.
आग लागताच फटाक्यांना त्याची झळ लागली आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे मोठ मोठे लोळ दूरवरून दिसू लागले.तर या ठिकाणी असलेल्या फटाक्यांचा आवाजही होऊ लागला तातडीने या घटनेची माहिती ही अग्निशमन दलाला देण्यात आली तोपर्यंत गावातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन हे ते फटाक्याचे गोडाऊनच्या दिशेने केले त्या ठिकाणी मिळेल त्या साहित्याने आग विजविण्याचे काम सुरू झाले त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आल्यानंतर तातडीने या ठिकाणी आज आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करू लागले आणि त्यानंतर सर्वसाधारण तीन तासापेक्षा अधिक कालावधीनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.