जव्हार प्रतिनिधी(मनोज कामडी)– सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ ओझर आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने ओझर गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. ओझर हे गाव डोंगरदऱ्यामध्ये असल्यामुळे आरोग्य, रस्ते नेटवर्क ,यांच्या मोठ्या समस्या आहेत तसेच आरोग्याची सुविधा नसल्यामुळे या परिसरातील रुग्ण आजारी असल्यास रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत किंवा पतंगशाह कुटीर रुग्णालय जव्हार येथे जावे लागत असे मात्र या शिबिराला मुळे रुग्णांना मोफत तपासणी व औषधे देण्यात आले.
या आरोग्य शिबिरात एच बी, बी पी,रक्तातील साखर,सर्दी, ताप,खोखला,आणि या प्रकारच्या आजाराचे तपासण्या व चाचण्या तसेच सर्व औषधे विनामूल्य देण्यात आले. ई स्मार्ट क्लिनिक च्या माध्यमातून लघवी, सुगर, HB,BP, नाडीचे परीक्षण,वजन,उंची, टी बी,टायफाईड, या सारख्या ३० ते ३५ प्रकारच्या लघवी आणि रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या.
या आरोग्य शिबिराचा एकूण १३० रुग्णांनी लाभ घेतला हे शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी सुदाम उंबरसाडा सरपंच ग्रा. पं दाभलोन व आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान संस्थापक, अंकुश धोडदे,अनिल खरपडे, संतोष कोरडा,संकेत गडग,तसेच प्राथमिक उपकेंद्र कोरतड येथील डॉ.ज्योती मॅडम व MPW भोये सर यांनी विशेष सहकार्य केले , मंडळाचे सर्व पदाधिकारी व गावातील तरुण मंडळाने मोलाचे सहकार्य केले.