Saturday, July 5, 2025

भारतात मंकीपॉक्सचा आढळला पहिला रुग्ण, केंद्र सरकारने केली अधिकृत घोषणा

भारतात मंकीपॉक्सचा आढळला पहिला रुग्ण, केंद्र सरकारने केली अधिकृत घोषणा
मुंबई: भारतात मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट झाले आहे. एमपॉक्स व्हायरसशी लढणाऱ्या देशात परतलेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. संक्रमण झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या नमुन्यांचा तपास केला जात आहे. आरोग्य मंत्रालयाने एक विधान जारी करून सांगितले की चिंतेची कोणतीही बाब नाही.

केंद्राच्या माहितीनुसार एक युवा पुरूष रुग्ण जो नुकताच मंकीपॉक्सच्या संक्रमण झालेल्या देशातून आला होता त्याला मंकीपॉक्स झाल्याचे समोर आले आहे.

 



ही केस WHO रिपोर्टचा भाग नाही - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या विधानात पुढे म्हटले की हे एक वेगळे प्रकरण आहे जे जुलै २०२२ मध्ये भारतात रिपोर्ट करण्यात आलेल्या पहिल्या ३० प्रकरणांसारखे आहे. हे सध्या सार्वजनिक आरोग्य आपातकालचा भाग नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा