Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीHealth: चिप्स, कुकीजला म्हणा NO, ऑफिसमध्ये हलक्या भुकेसाठी निवडा हे पर्याय

Health: चिप्स, कुकीजला म्हणा NO, ऑफिसमध्ये हलक्या भुकेसाठी निवडा हे पर्याय

मुंबई: लाईफस्टाईलमध्ये गडबड आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेक जण मोठ्या प्रमाणात आजारी पडत आङेत. जेव्हा तुम्हाला ऑफिसमध्ये हलकी भूक लागते तेव्हा तुम्ही चिप्स, कुकीज अथवा कोल्ड्रिंकच्या ऐवजी खालील हेल्दी पर्याय निवडू शकता.

सोया नट्स- कुरकुरे आणि स्वादिष्ट सोया नट्स हे सुक्या सोयाबीनपासून बनवले जातात. यात मोठ्या प्रमाणात फायबर, प्लांट प्रोटीन आणि अनेक पोषकतत्वे भरलेली असतात. सोया नट्स खाऊन तुम्ही सहज वजन कमी करू शकता आणि आरोग्याची काळजी घेण्यासोबत हाडेही मजबूत राहू शकतात.

मखाणा – यात चांगले फॅट असते. तसेच लो सॅच्युरेटेड फॅट कमी होते. डायबिटीज आणि हृदयरोगाने पीडित लोकांसाठी सुरक्षित फॉक्स नट्स हाय पोटॅशियम आणि कमी सोडियमचे चांगले कॉम्बिनेशन आहे. मखाणे खाण्यासाठी चांगले असतात आणि यात मसाले मिसूळून तुम्ही यांना आणखी स्वादिष्ट बनवू शकतात.

केळी – एक केळे आपल्या शरीराला संपूर्ण दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यासाठी मदत होते. केळ्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. यातील कार्ब्समुळे पोट भरलेले राहते.

सफरचंद – कॉफीच्या तुलनेत सफरचंद हे एनर्जीचा इफेक्टिव्ह स्त्रोत आहे. अंटीऑक्सिडंटने भरपूर असलेल्या सफरचंदामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. सफरचंद एनर्जी आणि प्रोटीनचे आयडियल कॉम्बिनेशन आहे.

बदाम – जेव्हा खाण्यासाठी तुम्ही हेल्दी ऑप्शन शोधत असता तेव्हा बदामाचा नंबर सर्वात वर येतो. हेल्दी फॅट आणि गरजेच्या तत्वांनी भरपूर बदाम फोकस वाढवण्यास मदत करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -