मुंबई: विभिन्न शास्त्रानुसार स्वप्न, हाताच्या रेषा इत्यादींबद्दल बरेच काही सांगितले आहे. यातच एक आहे समुद्रशास्त्र. समुद्रशास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या विविध अंगाबद्दल सांगितले आहे.
आपले दात हे शरीराच्या महत्त्वाच्या अंगापैकी एक आहे. जेवण जेवण्यासाठी, चघळण्यासाठी इत्यादी कामे दात करतात. ज्योतिषामध्ये दातांची भूमिका महत्त्वाची आहे. दातांचे महत्त्व आहे की जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्याला दात नसतात. जन्मानंतर तो जसजसा मोठा होत जातो तेव्हा त्याला दात येऊ लागतात.
सामान्यपणे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात ३२ दात असतात. मात्र सर्वांनाच ३२ दात असतातच असे नाही. काही लोकांना ३०,२९ आणि २८ दातही असतात. समुद्रशास्त्रामध्ये ३२ दात असणाऱ्यांना चांगले मानले गेले आहे. जाणून घ्या दातांच्या संख्येबाबत काय म्हणते समुद्र शास्त्र
३२ दात असलेले लोक
समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या दातांची संख्या ३२ असते ते खूप भाग्यवान असतात. त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द नेहमी खरे होतात. मग ती चांगली गोष्ट असो वा वाईट. सोबतच हे लोक सत्यवादी असतात. तसेच आपल्या जीवनात ते राजासारखे राहतात. यांच्या जीवनात भौतिक सुखाची कमतरता नसते. दरम्यान, काहींना संपूर्ण ३२ दात नसतात.
समुद्रशास्त्रानुसार दातांची संख्या जितकी कमी तितके जीवनात अधिक त्रास असतात. ३१ दात असलेले लोक भोग विलासमध्ये चतुर असतात. ३० दात असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती सामान्य असते. तसेच त्यांना जीवनात मोठा त्रास होत नाही. म्हणजेच हे लोक सामान्य जीवन व्यतीत करतात. ज्यांना २८ अथवा २९ दात असतात ते जीवनात थोडे दु:खी राहतात. यांना लवकर भाग्याची साथ मिळत नाही.