मुंबई: अभिनेता रितेश देशमुख इको फ्रेंडली गणेश चतुर्थीला प्राधान्य देतो. सोमवारी त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो आपल्या चिमुकल्यांसोबत गणपतीच्या इको फ्रेंडली मूर्त्या साकारताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये त्याची दोन मुले आहत.सोबतच त्याचे भाचेकंपनीही आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, गणपती बाप्पा मोरया! देशमुखांच्या घरात इकोफ्रेंडली गणेश बनवण्याची आणि सन्मानपूर्वक विसर्जनाची परंपरा. मुले आपला बाप्पा बनवत आहेत आणि प्रत्येक बाप्पा स्पेशल आहे.
हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते. या दिवशी सारेच जण आपल्या घरी गणपती बाप्पााला आणतात. त्यानंतरचे पुढील दहा दिवस अतिशय भक्तीमय वातावरण असते.
View this post on Instagram
आपण नेहमी चांगल्या कार्याची सुरूवात बाप्पााच्या आशीर्वादाने करतो. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या या दिवशी संपूर्ण देशभरात भक्तीमय वातावरण असते. मुंबईतही याची मोठी धूम असते. विविध मंडळाचे मोठमोठे गणपती, तसेच त्यांची विशेष आरास, सजावट, देखावे हे खरे वैशिष्ट्य असते.
अनेक कलाकारांनीही आपल्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती बसवली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थीचे फोटो शेअर केले जात आहेत.