शिवछत्रपतींची प्रतिमा दिली भेट
मुंबई : भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे सहकुटुंब दर्शन घेतले. पत्नी ऋतुजा, चिरंजीव निमिष यांच्यासह आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांच्या घरी श्रीगणेशाचे दर्शन घेतले. शिवछत्रपती महाराजांची प्रतिमा नितेश राणे यांनी फडणवीस यांना भेट दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्साहाने राणे कुटुंबाचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या खास मर्जीतील युवानेता म्हणून आमदार नितेश राणे यांची ओळख आहे.