Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाIND vs BAN: या दिवशी होणार बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा?

IND vs BAN: या दिवशी होणार बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा?

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आतापर्यंत बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. आता ही मालिका सुरू होण्यास अवघे १० दिवस शिल्लक आहेत. अशातच सर्वांनाच टीम इंडियाच्या निवडीची उत्सुकता आहे.

रिपोर्टनुसार उद्या म्हणजेच ९ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली कसोटी मालिका असणार आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले जात आहे की गंभीर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख सिलेक्टर अजित आगरकरसोबत मिळून संघाची निवड करतील.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघादरम्यान २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघादरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. टी-२० मालिकेसाठी रविवारी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संभाव्य १५ सदस्यीय संघ – रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन. मोहम्मद सिराज, आकाशदीप, केएल राहुल(रिझर्व्ह ओपनर), ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -