Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जव्हार तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान!

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जव्हार तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान!

शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे – आमदार सुनिल भुसारा

जव्हार : शिक्षण विभाग पंचायत समिती जव्हार अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा आदर्श शिक्षक सोहळा नुकताच घाची हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे उपस्थित होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनीलजी भुसारा उपस्थित होते. तसेच दिलीप पाडवी उपसभापती, सुरेखाताई थेतले सदस्या जिल्हा परिषद पालघर, चंद्रकांत रंधा सदस्य पंचायत समितीचा जव्हार, रियाजभाई मनियार माजी नगराध्यक्ष जव्हार ,दत्तात्रय चित्ते गटविकास अधिकारी, पुंडलिक चौधरी गटशिक्षणाधिकारी, प्रमिलाताई कोकड समाजसेविका ,संदीप माळी सरपंच कोरतड,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

जव्हार सारख्या दुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन यावर्षी ६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरिय आदर्श शिक्षक सोहळा संपन्न झाला.आदर्श शिक्षक सोहळ्याचे सत्कारमूर्ती म्हणून जव्हार तालुक्यातून विष्णू पिलाना जिल्हा परिषद शाळा कुंभारकांड,यशवंत गावित जिल्हा परिषद शाळा विनवळ, प्रवीण गावित जिल्हा परिषद शाळा मोकाशी पाडा,अरुण राजकवर जिल्हा परिषद शाळा पिंपळशेत, नेहा खाडे जिल्हा परिषद शाळा मेढा, जयराम दोडके जिल्हा परिषद शाळा धोंडपाडा, सुवर्णा भोर जिल्हा परिषद शाळा कळमविहिरा, संतू कांबळे जिल्हा परिषद शाळा खोरीपाडा, अशा एकूण आठ शिक्षकांना व दर्शना मुकणे जिल्हा परिषद शाळा काळीधोड यांचा जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी पुरस्कार सोहळा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनीलजी भुसारा आमदार विक्रमगड विधानसभा मतदारसंघ यांनी बालपणीतील शाळेतील आठवणींना उजाळा देऊन सर्व शिक्षकांना उपयुक्त व मौलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रकाशजी निकम अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर (राज्यमंत्री दर्जा) यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून उपस्थित सर्व शिक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सभापती विजयाताई लहारे,उपसभापती दिलीप पाडवी, सदस्य चंद्रकांत रंधा,जि. प. सदस्या सुरेखा थेतले, इतर मान्यवरांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करून तालुकास्तररिय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिक्षण विभागामार्फत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या योजनेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन शिक्षण विभागा मार्फत करण्यात आले होते जिल्हा परिषद शाळेतून काळीधोंड या शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गोरठण येथील शाळेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर जिल्हा परिषद शाळा शिरोशी या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. खाजगी व्यवस्थापन शाळेतून दिव्य विद्यालय शाळा जव्हार यांना प्रथम क्रमांक तर निलेश्वर मुर्डेश्वर विद्यालय जव्हार यांना द्वितीय क्रमांक तसेच युनिव्हर्सल इंग्लिश मिडीयम स्कूल जव्हार यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून उपस्थित मान्यवरांनी या सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुंडलिक चौधरी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जव्हार यांनी केले तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवी बुधर व दर्शना मुकणे यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -