Tuesday, October 8, 2024
Homeक्राईमMumbai News : मुलुंडमध्ये हिट अँड रन! भरधाव कारने दोघांना उडवले; एकाचा...

Mumbai News : मुलुंडमध्ये हिट अँड रन! भरधाव कारने दोघांना उडवले; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

मुलुंड : मुंबईत एकीकडे गणरायाचे आगमन होत असतानाच मुलुंडमध्ये (Mulund Accident) पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणाने मुंबईत आणखी एका तरुणाचा बळी घेतला आहे. मुलुंडमध्ये पहाटे एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बॅनर लावताना भरधाव बीएमडब्लू कारने दोन तरुणांना उडवलं. त्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी बीएमडब्लू कारच्या चालकाला अटक करण्यात आलीय. या घटनेनंतर आरोपी हा नवी मुंबई येथे पळून गेला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली. दरम्यान या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘मुलुंडचा राजा’ या गणेश मंडळावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमके काय घडले?

पहाटे चारच्या सुमारास एका बीएमडबल्यू कारने मुलुंड पूर्वेकडील गव्हाणपाडा परिसरातील ‘मुलुंडचा राजा’ या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना रस्त्यावर बॅनर लावत असताना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर आरोपी कार चालक शक्ती हरविंदर मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपीने गाडी थेट मुलुंड पश्चिमेकडे जाणाऱ्या पूर्व-पश्चिम उड्डाणपूलावरून भरधाव वेगाने नेली. मात्र या जोरदार धडकेत प्रीतम थोरात या तरुणाचा मृत्यू झाला. तर प्रसाद पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालिकेच्या वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कार चालकाचा शोध सुरु केला. आता या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. शक्ती हरविंदरने नुकतेच त्याची बीएमडबल्यू गाडी दुरुस्त केली होती. त्यामुळे ती व्यवस्थित काम करते की नाही हे पाहण्यासाठी त्याने परिसरात फिरवून बघत असताना अपघात झाला. पोलिसांनी ही अपघातग्रस्त कार मुलुंड कॉलनी येथून ताब्यात घेतली आहे.

अपघातानंतर आरोपीने गाडी घराजवळ लावून बाइकने नवी मुंबई गाठली. नवघर पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आरोपीवर दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथके तयार करण्यात आली होती. आरोपीला नवी मुंबईतील खारघर येथील मित्राच्या घरातून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नवघर पोलिसांनी आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -