मुंबई: आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी लोक विविध गोष्टींचे सेवन करत असतात. औषधी आणि अनेक गुणांनी भरपूर असलेले लवंग यापैकीच एक आहे.
भारतीय मसाल्यांमधील महत्त्वाचा घटक पदार्थ म्हणजे लवंग. लवंगाशिवाय मसाल्याला चव येत नाही. यामुळे जेवणाचा स्वाद वाढतो.
तज्ञांच्या मते रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने अनेक त्रास दूर होऊ शकतात.
जर तुम्ही दररोज लवंगाचे सेवन करत असाल तर यामुळे तुमच्या लिव्हरचे आरोग्य चांगले राहते.
रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मदत होते.
जर तुमच्या दातांमध्ये त्रास होत असेल तर तुम्ही लवंगाचा वापर केला पाहिजे.
तोंडाला दुर्गंधी येत असेल तर लवंगाच्या वापराने हा त्रास दूर होतो.
लवंगामध्ये मँगनीजचे प्रमाण अधिक असते. यामुळे हाडे मजबूत होतात.