Tuesday, May 13, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Big Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात 'या' रांगड्या गडीची होणार वाइल्डकार्ड एन्ट्री!

Big Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात 'या' रांगड्या गडीची होणार वाइल्डकार्ड एन्ट्री!

मुंबई : यंदाचा ‘बिग बॉस मराठी’ (Big Boss Marathi) चा हा नवा सिझन चांगलाच गाजत आहे. कार्यक्रमात असणारे सर्व कलाकारांमुळे यंदाच्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतेच बिग बॉस मराठीच्या घरात एलिमिनेशन झाले. यामध्ये छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडेला नारळ देण्यात आला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीने याबाबतचा नवा प्रोमो देखील शेअर केला. दरम्यान वाहिनीने नाव जाहीर केले नसले तरी प्रेक्षकांनी हा स्पर्धक कोण असेल याचा अंदाज वर्तवला आहे.


बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कोण वाईल्ड कार्ड सदस्य सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यादरम्यान अनेक नावे समोरही आली होती. याबाबत बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात खरचं वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार का? घरात कोण सदस्य येणार? अशा चर्चा रंगत होत्या. आता या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे.


कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये 'तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा…अस्सल फौलाद घालणार ‘बिग बॉस’च्या घरात राडा, असे म्हटले आहे. त्यामुळे अरबाज, वैभवला टक्कर देणारा हा नवा सदस्य कोण?' या प्रश्नाचे कोडं आज सुटणार आहे.


दरम्यान, वाइल्डकार्ड म्हणून चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये बॉडीबिल्डर संग्राम चौगुले याचेही नाव चर्चेत होते. अनेकांनी कमेंट करत हा संग्राम असल्याचे म्हटले आहे. चाहत्यांनी कलर्सच्या या पोस्टवर संग्रामला टॅग करत शुभेच्छा दिल्या, शिवाय काहींनी संग्रामच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही कमेंट केल्या आहेत. परंतु हा स्पर्धक खरंच संग्राम आहे की आणखी कोण, हे आज भाऊच्या धक्क्यावरच समजू शकणार आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)




Comments
Add Comment