Monday, October 7, 2024
Homeक्रीडाGanesh Chaturthi: बांगलादेशच्या क्रिकेटरने गणेश चतुर्थीला केली पुजा

Ganesh Chaturthi: बांगलादेशच्या क्रिकेटरने गणेश चतुर्थीला केली पुजा

मुंबई: गणेश चतुर्थीचा सण संपूर्ण देशभरात अतिशय धामधुमीत आणि उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने परदेशात राहणाऱ्या हिंदू कुटुंबियांनीही आपल्या घरी गणपतीची पुजा केली. क्रिकेटर्सही या उत्सवाचा भाग बनले. बांगलादेशचा क्रिकेटर लिटन दासनेही गणेश चतुर्थीनिमित्त घरी पुजेचे आयोजन केले होते. त्याने आपल्या कुटुंबासह पुजा-अर्चना केली.

बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी हिंसाचार घडला होता. यानंतर तेथील वातावरण अतिशय खराब झाले होते. यातच लिटन दासने सोशल मीडियावर पुजेचे फोटोही शेअर केले.

खरंतर लिटन दासने एक फोटो शेअर केला आहे. यात तो कुटुंबासोबत दिसत आहे. त्याने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरी पुजेचे आयोजन केले. लिटनने कुटुंबासोबता फोटो एक्सवर शेअर केला आहे. यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे अधिकतर भारतीय युजर्सनी यावर कमेंट केली आहे. चाहत्यांनी लिटनला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

लिटन बांगलादेशचा दमदार फलंदाज आहे. त्याने अनेकदा मोक्याच्या क्षणी चांगला परफॉर्मन्स केला आहे. लिटनने आतापर्यंत ७३ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने २६५५ धावा केल्या. यात ४ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. लिटनने ९१ वनडे सामन्यांत २५६३ धावा केल्यात. यात त्याने ५ शतके आणि १२ अर्धशतके ठोकलीत. त्याची वनडेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या १७६ इतकी आहे. लिटनने ८९ टी-२० सामन्यांमध्ये १९४४ धावा केल्यात.

बांगलादेशचा संघ १९ सप्टेंबरपासून भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्यांनी नुकतीच पाकिस्तानविरुद्ध २-० असा विजय मिळवला होता. बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच जमिनीवर त्यांना हरवत मोठा इतिहास रचला होता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -