मुंबई: देशात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे हे तर तुम्ही क्राईम पेट्रोल या शोमधून पाहिले असेल. हा शो अभिनेता अनुप सोनी होस्ट करत होता.
अनुप त्या दरम्यान या शोचा चेहरा बनला होता. तो ज्या पद्धतीने घटनेबद्दल माहिती देत असे ते प्रेक्षकांना खूप आवडत होते.
मात्र अनुपसाठी तो शाप ठरला होता. अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले की जेव्हा तो हा शो करत होता तेव्हा त्याच्याकडे ५-६ वर्षांसाठी कामासाठी कोणताच कॉल आला नाही. अनुप म्हणाला, जेव्हा मी वेब सीरिज बघत होतो तेव्हा विचार करायचो की इंडस्ट्रीमध्ये किती चांगले काम होत आहे आणि मी काय करत आहे.
मी अभिनेता आहे. मला अभियन करायचा आहे. मात्र मला कोणत्याच डायरेक्टरचा कॉल येत नव्हता. मला कोणीही काम देत नव्हते. कदाचित लोकांच्या डोक्यात हे बसले होते की मी खूप बिझी असेन. मात्र महिन्यातील ६-७ दिवसांपेक्षा अधिक त्या शोसाठी शूट करत नव्हतो.