
मिडिया रिपोर्ट्सनुसार हे अॅप WeConnectने पब्लिश केले आहे. BSNL Live TV सिंगल सीपीईच्या माध्यमातून इंटरनेट, केबल टीव्ही आणि लँडलाईन टेलीफोन सर्व्हिसेसच्या माध्यमातून वापरता येते. तर यात एक अँड्रॉईड बेस सिस्टीमच्या माध्यमातूनही हे ऑपरेट करता येते.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये बीएसएनएलने इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन सर्व्हिसला फायबरच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते. आता याची किंमत खूप कमी ठेवण्यात आली आहे. याची सुरूवातीची किंमत १३० रूपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे.
बीएसएनएलचे पुढील ध्येय पुढील वर्षी पहिल्या सहामाही पर्यंत देशभरात ५ जी नेटवर्क लाँच करण्याचे आहे. नुकतेच प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले होते की बीएसएनएलने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत १५००० हून अधिक ४जी साईट्स बनवल्या आहेत. कंपनी लवकरच या साईट्सला ५जी रूपांतरित करण्यासाठी तयार आहे.