Monday, October 7, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्य, ८ ते १४ सप्टेंबर २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, ८ ते १४ सप्टेंबर २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, ८ ते १४ सप्टेंबर २०२४

चांगले यश मिळू शकते

मेष :विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल कालावधी आहे. काही विद्यार्थ्यांना सरकारकडून उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्या काही व्यक्तींना अचानक त्रास होऊ शकतो. आपल्यावर खोटे आरोप येऊ शकतात. महत्त्वाची जबाबदारी ज्या व्यक्ती सांभाळत आहेत त्यांनी दक्ष राहावे. काही व्यक्तींना मात्र वरिष्ठांकडून लाभ मिळतील. जोडीदाराचे आरोग्य सांभाळा. आपल्या धैर्य आणि साहसाने अडचणीतून आपण मार्ग काढणार आहात. आपल्या धाडसापुढे विरोधक कच खातील. व्यापार-व्यवसाय क्षेत्रातही आपणास चांगले
यश मिळू शकते. नवीन व्यवसायात मोठी
गुंतवणूक टाळा.

आर्थिक चांगले लाभ मिळतील

वृषभ : विद्यार्थ्यांना हा कालावधी उपयोगीचा असणार आहे. विशेषतः कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हा कालावधी चांगला असेल, तसेच हॉटेल मॅनेजमेंट,
एम. बी. ए. जे विद्यार्थी करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम कालावधी आहे. आपल्या बुद्धीचा आणि धाडसाचा उत्तम फायदा आपणास होणार आहे. ज्या स्त्रिया गर्भवती आहेत, त्यांना पुत्ररत्न प्राप्त होऊ शकते. प्रेमिकांसाठी पण हा कालावधी चांगला आहे. शेअर्स, स्टॉक मार्केटच्या कामांमध्ये जे व्यवसायिक आहेत त्यांना हा कालावधी उत्तम लाभ देईल. व्यापार व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या चांगले लाभ मिळतील.

योजना कार्यान्वित होणार

मिथुन : मालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगला फायदा मिळेल. आर्थिक वादाचे जर काही प्रश्न असतील तर ते आपल्या बाजूने सुटतील. आपले कार्य प्रकाशझोतात येणार आहे. आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे. आपल्याला अपेक्षित असलेल्या योजना कार्यान्वित होणार आहेत. साहित्यिक, कवी यांचे प्रकाशन अपेक्षेप्रमाणे होईल. आपल्याला चांगली प्रसिद्धी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित चांगले बदल होतील. पगार वाढ होऊ शकते. आरामदायी वस्तूंवर खर्च होऊ शकतो. गाडी किंवा मोठ्या वस्तूची खरेदी होऊ शकते.

अनपेक्षित गोष्टी मिळतील

कर्क : आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धाडसी असणार आहात. आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपले प्रयत्न यशस्वी होणार आहेत. आपल्या इच्छापूर्तीचा काळ आहे. या कालावधीमध्ये प्रभावशाली व्यक्तींची ओळख होऊन त्यांच्याशी संबंध चांगले होतील. तुमच्या समृद्धीचा कालावधी असणार आहे. तुम्हाला अनेक अनपेक्षित गोष्टी मिळतील. त्या आपणास आनंद देणाऱ्या असतील. आपल्या नातेवाइकांकडून आपणास चांगले सहकार्य मिळेल. ज्या व्यक्ती नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरी मिळेल. पर्यटन स्थळांना भेटी द्याल. प्रवास चांगला होईल.

नवीन संधी येतील

सिंह : या कालावधीमध्ये आपल्यामध्ये पूर्णपणे आत्मविश्वास असणार आहे. आपण धडाडीने चैतन्याने, उत्साहाने काम करणार आहात. सार्वजनिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. न्यायालयीन कामामध्ये आपणास यश मिळणार आहे. आपले व्यक्तिमत्त्व आदर्श बनवणार आहे. आपल्या समस्या सुटणार आहेत. आपल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करणार आहात. वरिष्ठांची मर्जी राहणार आहे. महत्त्वाच्या कामामधील अडचणी दूर करण्याचे कौशल्य आपल्यामध्ये असणार आहे. व्यापार-व्यवसायात नवीन संधी येतील. त्याचा पुरेपूर फायदा घ्याल. आर्थिक स्थैर्य लाभणार आहे.

शांती आणि समाधानाचे वातावरण

कन्या : कुटुंबामध्ये शांती आणि समाधानाचे वातावरण असणार आहे. अचानक आपणास वारसा हक्काची संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आपण आपला जोडीदार आणि संततीच्या गरजांकडे पुरेपूर लक्ष देणार आहात. आपल्या वाणीमध्ये मिठास गोडवा असणार आहे. मधल्या कालावधीमध्ये आपण आपल्या आनंदासाठी प्रवास करणार आहात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. नोकरीतील टार्गेट पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या हा पूर्ण चांगला कालावधी आहे. कामातून मिळणारे उत्पन्न आपली पत उंचावणार आहे. वरिष्ठांची कृपादृष्टी राहणार आहे.

धार्मिक, सामाजिक कार्यामध्ये व्यस्त राहाल

तूळ :शुभ ग्रहाचे भ्रमण अतिशय उत्तम जाणार आहे. आपल्या राहणीमानात चांगला बदल होणार आहे. रत्न, अलंकार, दागिने यांचा व्यवसाय करणाऱ्यांना गोल्डन पीरिएड आहे. तसेच ब्युटी पार्लर, कापड व्यावसायिक यांचा पण व्यवसाय खूप चांगला होणार आहे. आर्थिक फायदे होणार आहेत. एकूणच सर्व व्यापार व्यवसायिकांना आर्थिक फायदा मिळणार आहे. व्यापार व्यावसायिकांना उत्तम कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात यामध्ये आपण धार्मिक किंवा सामाजिक कार्यामध्ये व्यस्त राहाल. एखादी मोठी जबाबदारी आपण स्वीकाराल. मात्र वाणीवर संयम ठेवा. आरोग्य उत्तम असणार आहे.

नाती जोडली जातील

वृश्चिक : आपले मानसिक स्थैर्य आणि नशिबाची साथ यामुळे जीवनामध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. उत्पन्नामध्ये आणि बँक बॅलन्समध्ये चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे. चांगल्या परिवर्तनाचा कालावधी आहे. नवीन मित्र व नवीन नाती जोडली जातील. आपल्याला त्यापासून फायदा मिळेल. व्यापार-व्यवसाय करणाऱ्यांना चांगला बदल होणार आहे. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांनाही नोकरीमध्ये चांगले वातावरण असेल. आपल्याकडून चांगले काम झाल्यामुळे वरिष्ठांची मर्जी राहणार आहे. कौटुंबिक पातळीवर आपणास जास्त जबाबदारी घ्यावी लागेल.

मनोबल चांगले असणार आहे

धनु : अशुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे भागीदारीमध्ये अडचणी येऊ शकतात. आपण या सर्व घटनांना धीराने सामोरे जाल. आपले मनोबल चांगले असणार आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तरी आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्याला सहकार्य करणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट या व्यवसायातील व्यक्तींना आर्थिक फायदे चांगले मिळतील. समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आपणास आपल्या कार्यामध्ये सहाय्य करतील. आपणाला नवीन कामे मिळतील त्यामध्ये अत्यंत फायदा होणार आहे. कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर या कालावधीमध्ये आपणास कर्ज मिळेल.

निर्णय प्रगतिपथावर नेतील

मकर : या सप्ताहामध्ये आपल्याला कष्ट करायची तयारी ठेवावी लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कंटाळा झटकून कामाला लागा. तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे. तुम्ही जास्त प्रयत्न न करता सुद्धा तुम्हाला चांगल्या संधी येऊ शकतील. घरी किंवा कार्यक्षेत्रात होणारे बदल आपल्यासाठी चांगले आहेत. मात्र या कालावधीमध्ये जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. हा खर्च वायफळ असणार आहे. त्यावेळी त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. आवक वाढल्यामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे. स्वप्न व तत्त्व यावर निश्चित प्रभाव पडेल. आपले निर्णय प्रगतिपथावर नेतील.

मार्ग मिळणार आहे

कुंभ : आपणास नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, त्याविषयी काही योजना असतील, तर त्या या कालावधीमध्ये पूर्ण होतील. यश आणि समृद्धीचा काळ आपली वाट बघत आहे. आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा कुठली काळजी सतावत असेल, तर आपल्या जीवनसाथीशी बोलून चर्चा करा. आपणास त्यातून निश्चित मार्ग मिळणार आहे. कुठल्याही आव्हानांना समोर जायची मनाची तयारी असणार आहे. घरात एखादे धार्मिक कार्य अनुष्ठान होऊ शकते. तुमचे अधिकाऱ्यांची आणि वरिष्ठांशी चांगले संबंध असतील. तुमच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होईल. तुमची प्रतिमा उंचावणारा आहे. हा कालावधी सर्वांगीण यशाचा असेल.

प्रगतीच्या भरपूर संधी

मीन : या कालावधीमध्ये तुम्ही आयुष्य पूर्ण सकारात्मक आणि चैतन्याने जगणार आहात. प्रवास, ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भरपूर संधी या काळात उपलब्ध होतील. स्वतःला व्यक्त करण्यासाठी सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. काही अनपेक्षित बदल होतील, पण ते आपणासाठी लाभकारी होतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. अडचणींवर मात करण्याचे धाडस आपल्यामध्ये असणार आहे. नवीन नवीन कल्पना आपल्याला सुचणार आहेत. त्या अमलात आणण्यासाठी आपल्याकडे मजबूत आत्मिक बल असणार आहे. विदेशाचे प्रवासाचे योग आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -