Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

तळकोकणातील पहिल्या सार्वजनिक बाप्पाचे जल्लोषात आगमन; यंदा ११९ वे वर्ष

तळकोकणातील पहिल्या सार्वजनिक बाप्पाचे जल्लोषात आगमन; यंदा ११९ वे वर्ष

सिंधुदुर्ग : कोकणातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या सावंतवाडीतील सालईवाड्याच्या राजाचे गुरूवारी मोठ्या जल्लोषात आगमन झाले. यंदा ११९ वे वर्ष असून २१ दिवस मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी करत रात्री गणरायाचे आगमन झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


भारत पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यावेळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली. तेव्हा या परंपरेला कोकणात पहिल्यांदा सावंतवाडी शहराने प्रतिसाद दिला. गेल्या ११८ वर्षापासून सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जात आहे.


यंदा मंडळाचे ११९ वे वर्ष आहे. चतुर्थी पासून पुढील २१ दिवस जल्लोषात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सावंतवाडीतील सालईवाडा येथे सन १९०६ मध्ये कै. विष्णुशेठ सापळे व कै. सितारामशेठ बांदेकर यांनी कोकणातील सर्वात पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करत गणरायाची प्रतिष्ठापना केली. गुरूवारी रात्री ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी करत या मंडळाच्या गणरायाचं आगमन करण्यात आले. चतुर्थी पासून पुढील २१ दिवस विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी राबविले जाणार आहेत.

Comments
Add Comment