Friday, May 23, 2025

क्रीडा

paris paraolympic 2024: पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास

paris paraolympic 2024: पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास

मुंबई: पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४मध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. ६ सप्टेंबरला पुरुषांच्या हाय जम्प T64 स्पर्धेत भारताचा खेळाडू प्रवीण कुमारने आशियाई रेकॉर्ड तोडत सुवर्णपदक पटकावले. पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. पहिल्यांदा भारताने पॅराऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत सहा सुवर्णपदक जिंकली आहेत. याआधी भारताने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये ५ सुवर्णपदके मिळवली होती.



भारत पदकतालिकेत १४व्या स्थानावर


२१ वर्षीय प्रवीणने २.०८ मीटरच्या बेस्ट जम्पसह सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत यूएसएचा डेरेक लॉकिडेंटने रौप्य तर उझबेकिस्तानच्या टेमुरबेक गियाजोवने कांस्य पदक पटकावले. डेरेकचा बेस्ट २.०६ मीटर राहिला तर टेमुरबेकने २.०३ मीटर हाय जम्प मारली.


प्रवीण कुमारच्या या सुवर्णपदकासोबत पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४मध्ये भारताच्या पदकांची संख्या आता २६वर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि १२ कांस्य पदके जिंकली आहेत. भारत २६ पदकांसह मेडल टॅलीमध्ये १४व्या स्थानावर आहे. सध्याच्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या अॅथलेटिक्स खेळाडूंचे हे १४वे मेडल आहे.


पॅराऑलिम्पिक गेम्समध्ये भारताने आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदके जिंकली होती.

Comments
Add Comment