Friday, October 24, 2025
Happy Diwali

Numerology: बाप्पााला अतिशय प्रिय आहे हा नंबर, तुमचा आहे का हा नंबर?

Numerology: बाप्पााला अतिशय प्रिय आहे हा नंबर, तुमचा आहे का हा नंबर?

मुंबई: अंकशास्त्रानुसार ५ मूलांक असलेल्या व्यक्तींवर गणपतीची विशेष कृपादृष्टी राहते. अंकाद्वारे तुम्ही तुमचे भविष्य जाणून घेऊ शका. जर तुमची जन्मतारीख ५,१४ आणि २३ असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक ५ असतो. या मूलांकाचा स्वामी बुध असतो. गणपतीला बुध ग्रहाचा कारक देवता मानले जाते.

गणेश चतुर्थी यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबरला आहे. या निमित्ताने ५ मूलांकाच्या व्यक्तीवर गणपती बाप्पाची कृपादृष्टी राहते. तसेच बुधवारच्या दिवशी गणपतीची पुजा अर्चा केल्याने लाभ मिळतात.

पुराणांनुसार गणपतीच्या पुजेने शत्रू आणि ग्रहदोषापासून बचाव करता येतो. यामुळेच गणपतीला विघ्नहर्ता असे म्हणतात. गणपतीची पुजा-आराधना केल्याने कुंडलीतील बुधची स्थिती मजबूत होते. त्या व्यक्तीला धन, बुद्धी आणि निरोगी आरोग्य लाभते. ५ मूलांकाच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीला खालील उपाय करावेत. यामुळे या व्यक्तींवर नेहमी गणपती बाप्पाची कृपा राहते. तसेच सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.

गणपतीला दूर्वा अर्पण करा. हिरव्या गोष्टींचे दान करा. मुलांना शिक्षणाशी संबंधित गोष्टी दान करा. गायीला चारा खाऊ घाला. हॉस्पिटलमध्ये आवश्यक औषधांचा पुरवठा करा.

गणेश मंत्र

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ५ मूलांकाच्या व्यक्तींनी गणेश मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने फायदा होतो. बुद्धीची देवता गणपती आपले आयुष्य धन-धान्यांनी भरून टाकते. रोजगार, व्यापार आणि करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर करतात.

एकदंताय विद्‍महे, वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात।।

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >