मुंबई:हिंदू धर्मात गणेश चतुर्थीचे खास महत्त्व असते. हा सण अतिशय धामधुमीत साजरा केला जातो. तसेच बाप्पाचे जोरदार स्वागत केले जाते.
१० दिवसांच्या या महोत्सवाची सुरूवात गणेश चतुर्थीच्या दिवसापासून होते. या वेळेस गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला साजरी केली जात आहे. तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.
ज्योतिषाचार्यांच्या मते गणेश चतुर्थीच्या दिवशी काही चुका करण्यापासून सावध राहिले पाहिजे.
गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन करू नये.
गणपतीच्या पुजेदरम्यान तुळशीची पाने चढवू नयेत. असे मानले जाते की तुळशीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. भगवान गणेशांनी नाराज होत तिला श्राप दिला होता.
गणेश चतुर्थीच्या पुजेदरम्यान कोणत्याही व्यक्तीने काळ्या अथवा निळ्या रंगाची वस्त्रे परिधान करू नयेत. या दिवशी लाल आणि पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करावीत.
दरवर्षी गणपतीच्या पुजेदरम्यान नव्या मूर्तीचा वापर करावा. जुनी मूर्ती विसर्जित करावी. सोबतच घरात गणपतीच्या दोन मूर्तीही ठेवू नयेत.