मुंबई: खाजगी टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी खास ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्सला अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. एअरटेलआधी रिलायन्स जिओने आपल्या ८व्या वर्षानिमित्त युजर्सला ऑफर देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता एअरटेलनेही आपल्या युजर्सला ही खास ऑफर देण्याची घोषणा केली आहे.
काय आहे ऑफर
एअरटेल आपल्या तीन प्लान्ससोबत प्रीपेड युजर्सला ऑफर सादर करत आहे. तर ही ऑफर ६ सप्टेंबरपासून ते ११ सप्टेंबरपर्यंत रिचार्ज करणाऱ्या युजर्सना दिली जाणार आहे. ही ऑफर कंपनीच्या ९७९, १०२९ आणि ३५९९ रूपयांच्या प्लान्सवर उपलब्ध आहे.
९७९ रूपयांचा प्लान
आता ९७९ रूपयांच्या एअरटेलच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. याशिवाय लोकांना यात अनलिमिटेड कॉलिंगसोबत २२ पेक्षा अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस एअरटेल एक्स्ट्रीमवर मिळतो. या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. मात्र आता नव्या ऑफरनुसार युजर्स २८ दिवसांसाठी १० जीबीचा डेटा कूपन दिले जाईल.
१०२९ रूपये आणि ३५९९ रूपयांचा प्लान
१०२९ रूपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला एअरटेल एक्स्ट्रीमवर २२हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म मिळतात. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह १०० एसएमएस दररोज फ्री मिळतात. या प्लानमध्ये आता ग्राहकांना २८ दिवसांसाठी १० जीबी इंटरनेट कूपन फ्री दिले जाते.
३५९९ रूपयांच्या एअरटेलच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १० जीबीचा डेटा २८ दिवसांसाठी फ्रीमध्ये दिला जात आहे. या प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची असते. या प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा प्रति दिवस दिला जातो. सोबतच लोकांना यात दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.