मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते महिलांच्या काही सवयी घर आणि पतीला आयुष्यात नेहमी आनंदी ठेवतात. त्यांच्या मते ज्या घरात महिलांना या सवयी असतात तेथे नेहमीच सुख-शांती असते.
अशा घरांमध्ये राहणारे लोक नेहमीच प्रगती करतात. घरात कधीही नकारात्मक वातावरण राहत नाही.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार स्त्रीने कधीही क्रोधी स्वभावाचे असता कामा नये. क्रोधामुळे संकटे अधिक वाढतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या घरातील स्त्री क्रोधी स्वभावाची नसते तिथे वातावरण नेहमी सकारात्मक राहते.
ज्या महिलेकडे समाधानी वृत्ती असते ती घराला नेहमी स्वर्गासारखी बनवते.
आचार्य चाणक्य म्हणतात की मनाने समाधानी असणाऱ्या महिला नेहमी आपल्या पतीला प्रत्येक सुख:दुखात साथ देतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते जी महिला धार्मिक विचारांना मानते त्यांचे घर नेहमी आनंदाने भरलेले असते. धार्मिक विचारांच्या महिला घराला स्वर्गासमान बनवतात. देवाची कृपा नेहमीच त्यांच्यावर राहते.