गणेशभक्तांना गावी जाण्यास आम्हाला विशेष रेल्वे सोडता आली याचे समाधान -निलेश राणे
मुंबई/ सिंधुदुर्ग : दरवर्षीप्रमाणे खा. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून भाजपा नेते निलेश राणे यांनी प्रायोजित केलेली भाजपा एक्सप्रेस गुरुवारी दादर मुंबईहून कुडाळकडे रवाना झाली. खास गणेशोत्सवासाठी दादरहून येथून कुडाळ मालवणला जाण्यासाठी भाजपा एक्स्प्रेस अशी विशेष रेल्वे सोडण्यात आली. या गाडीला निलेश राणे यांनी झेंडा दाखवल्यावर रेल्वे कुडाळकडे रवाना झाली. हे सगळे गणेशभक्त आपल्या गावी गणपती उत्सवानिमित्त सहज पोहोचणार आहेत. त्यांना ही सेवा देऊ शकलो , याचे समाधान आहे.असे भाजपा नेते निलेश राणे म्हणाले. अनेक प्रवाशांनी त्यांची भेट घेत मनोमन आभार व्यक्त केले. रात्री ही एक्सप्रेस कुडाळ येथे दाखल झाली.
सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुंबईत राहणाऱ्या आणि आपल्या गावी कुडाळ मालवणला जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व गणेश भक्तांसाठी मोफत रेल्वे प्रवास करत गावी येण्यासाठी भाजपा नेते निलेश राणे यांनी ‘दादर -कुडाळ नॉनस्टॉप भाजपा एक्सप्रेस’ सोडली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून ही गाडी रवाना झाली. रेल्वेत तिकीट मिळत नाही. गावी कसे जायचे? या चिंतेत असलेल्या गणेशभक्तांना ही मोठी पर्वणीच होती.
गुरुवारी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्टेशनवरुन ‘भाजपा एक्सप्रेस दादर-कुडाळ नॉनस्टॉप’ या रेल्वेला भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी झेंडा दाखविला व त्यानंतर ही रेल्वे कोकणच्या दिशेने रवाना झाली. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुंबईत राहणाऱ्या व आपल्या गाव कुडाळ-मालवणला जाण्याची इच्छा असणाऱ्या कोकणवासिय गणेश भक्तांसाठी भाजपा नेते निलेश राणे यांनी मोफत रेल्वे प्रवासाचे आयोजन केले होते.
यावेळी दादर रेल्वे स्टेशनवर उपस्थित असणाऱ्या कोकणवासियांनी दरवर्षी गावी जाण्यासाठी मोफत सुविधा व थेट घराजवळ पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार मानले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी, महिलांनी, लहान बालकांनी निलेश राणे यांच्याशी सुसंवाद साधला. रेल्वे गाडी कार्यक्रमात भाजपा नेते निलेश राणे यांच्या सभोवताली कोकणच अवतारल्याचे व हा कार्यक्रम दादर रेल्वे स्टेशनला नव्हे तर मालवण-कुडाळात होत असल्याचे चित्र यावेळी निर्माण झाले होते.