मुंबई: मुलांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तुम्हीही जर शिक्षक दिनाला विचार करत आहात की शिक्षकांना काय गिफ्ट द्यायचे तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगत आहोत. यामुळे तुमचे शिक्षक प्रसन्न होतील.
कॉफी मग- तुम्ही तुमच्या शिक्षकांना छान प्रिंट असलेला कॉफी मग द्या. या मगवर काहीतरी छान लिहिलेले असेल. अथवा त्यांचा फोटो असेल. जेव्हा ते या कपात कॉफी पितील तेव्हा त्यांना तुमची आठवण येईल.
पुस्तक – शिक्षकांना वाचायला आणि शिकवायला आवडतेच. तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकांना त्यांच्या आवडत्या लेखकाचे एखादे पुस्तक भेट म्हणून देऊ शकता.
फोटो कोलाज – टीचर्स डे स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही टीचरसोबतचा फोटो कलेक्शन करून कोलाज बनवू शकता. हे कोलाज तुम्ही फ्रेमही करू शकता.
पेन – शिक्षकांना पेन देणे ही चांगली गिफ्ट आयडिया ठरू शकते. तुम्ही तुमच्या शिक्षकांना एखादे छानसे पेन आणि पेन स्टँड गिफ्ट करू शकता.
स्मार्ट वॉच – जर तुमचे बजेट अधिक असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना स्मार्ट वॉचही देऊ शकता.