मुंबई: बॉलिवूड आणि स्पोर्ट्स क्षेत्रातून येणाऱ्या सेलिब्रेटी टॅक्सपेयर्समध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान पहिल्या स्थानावर आहे. शाहरूख खानने आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये ९२ कोटी रूपयांचा ट२क्स भरला आहे. दुसऱ्या स्थानावर तामिळ सिनेमातील अभिनेता विजय आहे. त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात ८० कोटी रूपये भरला आहे.
स्पोर्ट्सपर्सनमध्ये इनकम टॅक्स देण्याच्या बाबतीत क्रिकेटर विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने ६६ कोटी रूपये इनकम टॅक्स दिला आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ३८ कोटी रूपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
बॉलिवूडचे सेलिब्रेटी टॅक्सपेयर्स
टॅक्स भरणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शाहरूख खानने ९२ कोटी रूपये इनकम टॅक्स भरला आहे. ८० कोटी रूपये टॅक्स भरण्यासोबत अभिनेता विजय दुसऱ्या स्थानावर आहे. ७५ कोटी टॅक्स भरण्यासोबत सलमान तिसऱ्या स्थानावर आहे. बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन ७१ कोटींचा टॅक्स भरण्यासोबत चौथ्या स्थानावर आहे. तर अजय देवगणने ४२ कोटी रूपये आणि रणबीर कपूरने ३६ कोटी रूपये टॅक्स भरला आहे.
ऋतिक रोशनने २८ कोटी रूपये, कपिल शर्माने २६ कोटी रूपये, करीना कपूरने २० कोटी रूपये, शाहीद कपूरने १४ कोटी रूपये, कियाराने १२ कोटी रूपये तर कतरिना कैफने ११ कोटी रूपये टॅक्स भरला आहे.
यात क्रिकेटर्सच्या नावांचाही समावेश आहे. विराट कोहली ६६ कोटी रूपयांच्या टॅक्स भरण्यासह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने ३८ कोटी रूपये टॅक्स भरला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आर्थिक वर्ष २०२३-१४मध्ये २८ कोटी रूपयांचा इनकम टॅक्स भरला आहे. तर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने १३ कोटी रूपये आणि ऋषभ पंतने १० कोटी रूपयांचा इनकम टॅक्स भरला आहे.