एकाच महिलेला किती संधी देणार? रुपाली पाटील-ठोंबरे विरुद्ध चाकणकर धुसफूस चव्हाट्यावर

  173

मुंबई : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे. सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. याच बरोबर महायुतीतील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. मात्र, असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रुपाची चाकणकर यांचे नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अजित पवार गटातील मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत ‘एकाच महिलेला किती संधी देणार?’, असे म्हणत सवाल उपस्थित केले आहेत.


एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार न्याय नक्की देतील, असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? कालपासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही, असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत. त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल’, असे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटले आहे.


रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, त्यांच्या प्रश्नांवर आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या उत्तर देतील. मला वाटत नाही की त्यांचे प्रश्न हे उत्तर देण्यासारखे आहेत. आता मला हे सर्व प्रश्न तुमच्याकडून समजत आहेत. त्यामुळे याबाबत मला काहीही माहिती नाही. आमच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. त्यामुळे मी काहीही पाहिलेलं नाही. मी त्यांचे प्रश्न पाहते आणि माहिती घेते, त्यानंतर माहिती देते, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Comments
Add Comment

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.