Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा सुंदर Photos

लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा सुंदर Photos
मुंबई: गणेशोत्सवाला अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळेच साऱ्यांनाच आपल्या लाडक्या गणरायाची आस लागून राहिली आहे.



मुंबईतील मंडळांनीही आपापल्या मूर्ती दरबारी आणल्या आहेत.



संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबाग गणेशमंडळाच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सारेच उत्सुक असतात.



यंदाच्या वर्षी आपला राजा कसा दिसत असेल याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. अखेर लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.



यंदाही गणेशोत्सवाला लालबागच्या राजा मंडळाने जोरदार तयारी केली आहे.



तसेच लालबागच्या राजाला येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी पाहता तेथे जोरदार तयारी तसेच दर्शनासाठीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
Comments
Add Comment