मुंबई: ग्रहांचा राजा सूर्य १६ सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करत आहे. यानंतर सूर्य १७ ऑक्टोबरला तूळ राशीत गोचर करत आहे.
ज्योतिषाचार्यांच्या मते कन्या राशीमद्ये गेल्यानंतर तीन राशीच्या व्यक्तींना लाभ देणार आहे. जाणून घेऊया या लकी राशींबद्दल…
तूळ
तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची वेळ आली आहे. तुम्हाला धन-धान्याची प्राप्ती होईल. रूपये-पैसे कमावण्याच्या नव्या संधी प्राप्त होतील. आत्मविश्वास वाढल्याने करिअरमध्ये नव्या उंची गाठतील. लाईफ पार्टनरसोबत क्वालिटी टाईम घालवाल. समाजात मान-सन्मान वाढेल.
वृश्चिक
नोकरी-व्यवसायात लाभ मिळण्याची मोठी शक्यता आहे. कर्जातून सुटका मिळेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. दीर्घकाळ थांबलेले काम पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत तीर्थस्थळी जाल. भावा-बहिणींसोबत नातेसंबंध मजबूत होतील.
मकर
या गोचरनंतर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुठे अडकलेले धन मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारी वर्गासाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला फायद्याची डील मिळेल. खर्चामध्ये कमतरता येईल.