
मुरुड : मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील संदीप भालचंद्र चिरायू यांची भाजपाच्या मुरुड तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्ष शैलेश काते यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि, पक्षातील आपले योगदान लक्षात घेऊन मुरुड तालुका सरचिटणीस पदी आपली नियुक्ती करणेत येत आहे.
संदीप चिरायू यांची मुरुड तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.