मुंबई: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. राहुलला आयपीएल २०२५च्या हंगामाआधी राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. या वर्षी जीनमध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होते.
द्रविडने नुकतीच फ्रेंचायजीसोबत एक डील साईन केली आहे. ते आगामी मेगा ऑक्शपासून खेळाडूंना रिटेन करण्याबाबत सुरूवातीपासून बातचीत केली आहे. द्रविडचे अंडर १९च्या काळापासूनच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसोबत चांगले नाते राहिले आहे.
द्रविडचा राजस्थान रॉयल्सशी बऱ्याच काळापासून संबंध आहेत. ते आयपीएल २०१२ आणि २०१३मध्ये राजस्थानचे कर्णधार होते आणि २०१४ आणि २०१५ आयपीएल हंगामात संघाचे डायरेक्टर आणि मेंटरच्या रूपात काम केले आहे. २०१६मध्ये द्रविड दिल्ली डेअरडेविल्समध्ये गेले होते.
२०१९मध्ये राहुल द्रविडला बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये हेड कोचची जबाबदारी मिळाली आहे. २०२१मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या तीन वर्षाच्या कोचिंग कार्यकाळात भारतीय संघाला WTC फायनल २०२१ आणि २०२३, वनडे वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये पोहोचवले. तर २९ जून २०२४ला त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत टी-२० वर्ल्ड चॅम्पियन ठरला.