Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीGanesh Festival 2024 : विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढाल तर पस्तावाल!

Ganesh Festival 2024 : विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढाल तर पस्तावाल!

पोलीस पत्रकांतील आदेशानुसार होणार कारवाई

मुंबई : येत्या ७ सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार असून त्यानंतर दीड दिवसापासून पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत विविध दिवशी गणरायाचे विसर्जन (Ganesh Festival 2024) करण्यात येते. त्यासंदर्भातच पोलिसांकडून काही महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ०८, ११, १२, १३ आणि १७ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार असून, गणेश विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढू नका, असे पोलीस पत्रकात स्पष्ट करताना या आदेशाचे उल्लंघ केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल आणि दंडही ठोठावला जाणार आहे. त्यामुळे पाण्यात विसर्जन केल्यानंतर गणपतीचा फोटो काढल्यास पस्तवण्याची वेळ भाविकावर येउ शकते.

लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असून गणेशाच्या स्वागतासाठी सर्व भक्तगण सज्ज झाले आहेत. पूजा, प्रसादाची तयारी, डेकोरेशन, या सर्व कामांची लगबग आता सुरू झाली. मात्र याच दरम्यान पोलिसांनी काही महत्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढून नका. विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढले, तसेच प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे महत्वाचे आदेश दिले आहेत. विसर्जनानंतर काही अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येतात किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगतात. काही लोक अशा तरंगणाऱ्या मूर्तीचे फोटो काढतात, तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी मूर्ती गोळा करतानाचे फोटो टिपतात आणि धार्मिक भावना दुखावतील तसेच सार्वजनिक शांतता व भावना भंग पावतील असे फोटो प्रसारित अथवा प्रकाशित करतात.

विसर्जनानंतर असे फोटो काढणे, प्रकाशित करणे, हे प्रतिबंधित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना आवश्यक आहेत. आणि कलम १६३ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अन्वये त्वरीत प्रतिबंधासाठी जलद उपाय करणे इष्ट आहे. ८ सप्टेंबर ते १८सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -