Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीपैशांच्या नोटा छापण्यासाठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या

पैशांच्या नोटा छापण्यासाठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या

मुंबई: भारतीय बाजारात नोटांचे चलन हे नाण्यांच्या तुलनेत अधिक आहे. याच कारणामुळे भारत सरकार नाण्यांच्या तुलनेत नोटांची छपाई करण्यावर जोर देते. जाणून घ्या की भारताला १०,२०, ५०, १००, २०० आणि ५०० रूपयांच्या नोट छापण्यासाठी किती खर्च येतो.

आरबीआय किती नोटा छापू शकते

कोणतेही सरकार अथवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हव्या तितक्या नोटा छापू शकत नाही. नोट किती छापल्या जाव्यात यासाठीही एक नियम आहे. खरंतर, आरबीआय भारतात किती नोटा छापू शकते हे न्यूनतम आरक्षित प्रणालीच्या आधारावर ठरवले जाते.

ही सिस्टीम भारतात १९५७ पासून काम करत आहे. या सिस्टीमनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला २०० कोटी रूपयांची संपत्ती आपल्याकडे ठेवावी लागेल. यात ११५ कोटी रूपयांचे स्वर्ण भांडार आणि ८५ कोटी रूपयांच्या विदेशी मुद्राचा समावेश आहे. इतका पैसा स्टोर केल्यानंतरच आरबीआय अर्थव्यवस्थेच्या आवश्यकतेनुसार अनिश्चित काळापर्यंत मुद्रा छापण्यासाठी स्वतंत्र होते.

भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेडकडू आरटीआयच्या माध्यमातून जेव्हा याबाबत उत्तर मागितले तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२१-११मध्ये १० रूपयांच्या १ हजार नोट छापण्यासाठी ९६० रूपये खर्च करावे लागले होते. या हिशेबाने पाहिल्यास एक १० रूपयांची नोट छापण्यासाठी सरकारला ९६ पैसे खर्च करावे लागले होते.

या वर्षी २० रूपयांचे एक हजार नोट छापण्यासाठी ९५० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच एक २० रूपयांची नोट छापण्यासाठी ९५ पैसे खर्च आला होता. तर २०२१-२२मध्ये ५० रूपयांच्या एक हजार नोट छापण्यात १,१३० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच एक ५० रूपयांची नोट छापण्यात १ रूपये १३ पैसे आरबीआयला खर्च करावे लागतात.

आरबीआयला १०० रूपयांच्या एक हजार नोट छापण्यासाठी एकूण १७७० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच १०० रूपयांची एक नोट छापण्यासाठी आरबीआयला १.७७ रूपये खर्च करावे लागले. २००च्या नोटेबाबत बोलायचे झाल्यास या आर्थिक वर्षात २००च्या एक हजार नोट छापण्यासाठी आरबीआयला २३७० रूपये खर्च करावे लागले. म्हणजेच २००ची एक नोट छापण्यासाठी आरबीआयला २.३७ रूपये खर्च करावे लागतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -