गणेशोत्सवासाठी कोकण आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला असताना मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. अशातच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ऐन सणाच्या काळात लालपरीला ब्रेक लागल्यामुळे चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. उत्सवात कोकणात जाण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांच्या पदरी निराशा असताना रेल्वे प्रशासनाकडून (Konkan Railway) आनंदाची बातमी समोर आली आहे.
येत्या शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी सर्वांच्या घरी गणराया विराजमान होणार आहे. मोठ्या संख्येने प्रवाशी गणरायाच्या आगमनासाठी गावाकडे निघाले आहेत. त्यातच एसटी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे अनेकजण रेल्वे प्रवासाकडे वळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान कोकण आणि मध्य रेल्वेने विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची केली आहे.त्यामुळे गणरायाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरणार आहे.
गाडी क्र. ०११०३ / ०११०४ मुंबई सीएसएमटी – कुडाळ – मुंबई सीएसएमटी विशेष (अनारिक्षित)
- गाडी क्रमांक ०११०३ सीएसएमटी येथून ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल. कुडाळला गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०११०४ कुडाळ येथून ५ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:३० वाजता सुटेल आणि सीएसएमटीला त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता पोहोचेल.
- थांबे – दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, आणि सिंधुदुर्ग.
- डबे – एकूण २० = सामान्य – १४ डबे,स्लीपर – ०४, एसएलआर -०२