सोलापूर : मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना जीवे मारून टाकेन अशी धमकी दिल्याने या त्रासाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सुरज सुभाष नकाते (वय २९), तोसिफ चाँदसाो मुजावर (वय २४), शुभम मोहन नकाते (वय २४) या तिघांना पोलिसांनी अटक केले आहे.
मृत महिलेचा पती कुटुंबासह पुणे येथे राहण्यास होते. हे कुटुंब २८ जुलै २०२४ रोजी त्यांच्या मूळ गावी आले होते. यातील आरोपी हा नातेवाईक असल्याने तो नेहमी पुणे येथे घरी फिर्यादी घरी नसताना ये जा करीत असे. तो नातेवाईक असल्याने मृत पत्नीच्या पतीला कुठलाही संशय आला नव्हता. तर तिघे आरोपी हे खास मित्र आहेत. ही महिला २१ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तिच्या आईला भेटण्यासाठी घरी जावून येते असे सांगून गेली होती.