तज्ज्ञांनी दिला सबुरीचा सल्ला
मुंबई : आजकाल प्रत्येक क्षेत्रात इन्स्टाग्राम रिल्स हे एक माध्यम बनले आहे. ज्यामुळे कोणीही आपली वेगळी कला सादर करू शकतात. सर्वत्र प्रसिध्द होण्याचे हे एक उत्तम व्यासपीठ बनले आहे. परंतु त्याची दुसरी बाजू पुढे आली असून,वारंवार रिल्स बघणे हे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्मार्टफोन ही आपल्या आयुष्याची एक गरज बनली आहे. अगदी लहान मुलांच्या हातात देखील आता मोबाईल फोम आले आहेत. अनेकांना याचे व्यसन लागले आहे. अनेकजण दिवसभरातील काही मिनिटांची उसंत मिळाली असता वारंवार रिल्स बघताना दिसतात.कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा हानिकारक ठरतो हे तितकेच खरे आहे.
सोशल मीडियातील वाढता डिजिटल कंटेंट,त्याच्या आपल्या मानसिक आरोग्यावर होणारा भडीमार,यातून अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्येला सामोरं जावे लागू शकते. काही आरोग्यविषयक तज्ज्ञांनुसार, सोशल मीडिया किंवा इतर मनोरंजनाची साधने जास्त वेळ बघितले जाते तेव्हा एखाद्या व्यक्तीची मानसिक क्षमता आणि विचार करण्याची क्षमता कमी झाल्याचे जाणवते. तेव्हा त्या माणसामध्ये ब्रेन रॉटची लक्षण असल्याची शक्यता आहे.
ब्रेन रॉटमुळे एखाद्या व्यक्तीचे लक्ष कोणत्याही एका कामावर जास्त काळ राहत नाही तसेच जास्त स्क्रीन टाईममुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिकरित्या थकवा जाणवतो व स्मरणशक्तीच्या समस्या सामोरे जावे लागते.स्मार्टफोन, इंटरनेट आणि इतर उपकरणांराचा अतिवापर हा शक्य असल्यास टाळावा ज्यामुळे मानसिक आरोग्य चागंले राहण्यास मदत होऊ शकते.