मुंबई: स्वत:शी बोलण्यासाठी वेळ काढल्याने स्वत:ला अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यात मदत होते. यामुळे मानसिक आरोग्य चांगले राखले जाते.
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की सेल्फ टॉकच्या माध्यमातून तुम्ही स्वत:चे मानसिक आरोग्य कसे चांगले राखू शकता. जेव्हा तुम्ही स्वत:शी बोलता तेव्हा तुम्हाला तुमच्या कमकुवत बाजू अधिक चांगल्या रीतीने समजतात.
तसेच कोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे हे ही समजते. तसेच स्वत:वरील आत्मविश्वास वाढतो. सेल्फ टॉकमुळे तुम्ही तुमच्या समस्यांचे निराकरण करू शकता. स्वत:ला अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकता.
काही जण आपल्या जीवनातील मोठे निर्णय स्वत: घेऊ शकत नाही. कारण त्यांना स्वत:वर विश्वास नसतो. त्यांना स्वत:शी बोलण्याची सवय नसते. मात्र जे लोक सेल्फ टॉक करतात त्यांच्यासाठी निर्णय घेणे सोपे बनते.
सेल्फ टॉक केल्याने आपल्या कमकुवत बाजू समजण्यास मदत होते. तसेच आपली ताकद आणि कमजोरी समजते. तसेच कोणत्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. हे समजते.
सेल्फ टॉक सेल्फ मोटिव्हेशन वाढवण्यास मदत करतात. यामुळे मोठ्यातील मोठ्या गोष्टींसाठी स्वत:ला तयार करू शकता.