मुंबई: जिओ ग्राहकांना नेहमीच रिचार्जचे विविध पर्याय उपलब्ध करून देत असते. तुम्हाला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय दिसतील. कंपनी स्वस्त, महाग असे अनेक रिचार्ज प्लान्स देत असते.
नुकतेच कंपनीने आपले सर्व प्लान्स रिवाईज केले. कंपनीने आपल्या व्हॅल्यू प्लान्सलाही रिव्हाईज केले. हे प्लान्स कमी किंमतीत चांगली व्हॅल्यू ऑफर करतात.
असाच एक प्लान १८९९ रूपयांचा आहे. हा प्लान कंपनीच्या पोर्टफोलिओचा सर्वात स्वस्त लाँग टर्म प्लान आहे. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या तिघांचे फायदे मिळतात. दरम्यान, यात केवळ २४ जीबी डेटा मिळतो.
याशिवाय कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३६०० एसएमएस ऑफर करते. या प्लानमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात.
युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्हाला जिओ सिनेमा प्रिमियम आणि जिओ टीव्ही प्रिमियम याचा अॅक्सेस मिळणार नाही.
या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटासोबत येत नाही. म्हणजेच तुम्हाला डेटा संपल्यानंतर अतिरिक्त डेटा बूस्टर रिचार्ज करावा लागेल.
जिओचा हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना कमी किंमतीत अधिक दिवसांची व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.