मुंबई: प्रत्येकाला असे वाटते की केस लांब आणि घनदाट असावेत. ज्यांचे केस पातळ असतात ते नेहमीच विविध पर्याय वापरत असतात. यामुळे केस वाढण्यास मदत मिळते.मात्र केवळ बाहेरून काही पदार्थ लावून केस लांब आणि घनदाट होत नाहीत तर आतूनही काही गोष्टींचे सेवन करणे गरजेचे असते.
यामुळे शरीराला आवश्यक ती पोषकतत्वे मिळतात. तसेच केसांची वाढ निरोगी होते. जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल…
अंडी
केसांना पुरेसे प्रोटीन देण्यासाठी तुम्ही अंडी खाऊ शकता. प्रोटीनने भरलेल्या अंड्यांचा डाएटमध्ये समावेश करणे सोपे आहे आणि केसांसाठी चांगलेही. तुम्ही नाश्त्यामध्ये दररोज अंडी खाऊ शकता.
पालक
केसांसाठी पालक खाणे अतिशय गरजेचे आहे. कारण पालकामध्ये आर्यन मोठ्या प्रमाणात असते. शरीरात लोहाची कमतरता झाल्यास केस गळू लागतात.
सुका मेवा
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे सेवन करणे चांगले असते. सुका मेवा जसे बदाम आणि अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते.
आंबट फळे
व्हिटामिन सी शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करते. यामुळे आपल्या खाण्यापिण्यात नेहमी आंबट फळांचा समावेश जरूर करावा. सोबतच स्काल्पसाठी व्हिटामिन सी चांगले असते.
गाजर
व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात असलेल्या गाजराचा डाएटमध्ये समावेश केल्यास केसांची वाढ निरोगी होते. व्हिटामिन ए स्काल्पला नॅचरल सीबम बनवण्यास मदत करतात. तसेच केसांची मुळे निरोगी राहतात.