Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीकोर्ट गार्डच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; ३ क्रू मेंबर बेपता!

कोर्ट गार्डच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; ३ क्रू मेंबर बेपता!

पोरबंदर : भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेत हेलिकॉप्टरमधील चारपैकी तीन जण बेपत्ता असल्याची माहिती असून, कोणाचा शोध सुरू आहे. एका क्रू मेंबरला वाचवण्यात यश आले आहे.

यासंदर्भात भारतीय तटरक्षक दलाने एक निवेदन जारी करून सांगितले की सोमवारी रात्री ११ वाजता भारतीय ध्वजांकित मोटार टँकर हरी लीलावरील गंभीर जखमी क्रू सदस्याला मदत करण्यासाठी हेलिकॉप्टरने मदत पथक समुद्रात पाठवण्यात आले. गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. तटरक्षक दलाच्या ताफ्यात ४ जण होते. ऑपरेशन दरम्यान हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

हेलिकॉप्टर समुद्रात इमर्जन्सी लँडिंगचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हेलिकॉप्टर मोटार टँकरपर्यंत पोहोचणार असताना काही कारणांमुळे हेलिकॉप्टर समुद्रात उतरावे लागले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील बेपत्ता सैनिकांचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाने ४ जहाजे आणि २ विमाने बचाव कार्यात तैनात केली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -