Saturday, March 22, 2025
Homeदेशदेशातील ९५ टक्के भारतीय Spam Callsने झालेत हैराण

देशातील ९५ टक्के भारतीय Spam Callsने झालेत हैराण

मुंबई: देशभरात स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. TRAI च्या प्रयत्नांनंतरही अशा प्रकरणांमध्ये वाढच होत आहे. दरम्यान, नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये याचा खुलासा झाला आहे. सर्व्हेनुसार तब्बल ९५ टक्के भारतीयांना दररोजच्या येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसचा त्रास होत आहे. इतकंच की गेल्या ६ महिन्यांत यात वाढ झाली आहे. सोबतच फोनमध्ये असलेले DND फीचरही असे कॉल्स रोखण्यात फायदेशीर ठरत नाही आहे.

नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. यानुसार ९५ टक्के भारतीय मोबाईल युजर्सला दररोज स्पॅम कॉल्सचा सामना करावा लागतो. स्कॅमर्सही दररोज लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहेत. असे कॉल्स होम लोन, क्रेडिट कार्डसह फायनान्शियल सेक्टरमधून येत आहेत. गेल्या सहा महिन्यात या केसेसमध्ये ५४ टक्क्यांवरून ६६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

DND फीचरचा फायदा नाही

स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्यांकडून दिले जाणारे Do Not Disturb हे फीचरही फायद्याचे ठरत नाही आहे. स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसमुळे लोक चांगलेच त्रस्त आहेत.

TRAI उचलणार ठोस पाऊल

टेलिकॉम कंपन्यांना प्रोमेशनल मेसेजेस रोखण्याचे आदेश दिले होते. याची डेडलाईन १ सप्टेंबर होती. याची डेडलाईन वाढवून १ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली आहे. ट्रायच्या मते लवकराच लवकर या कॉल्सवर रोखण्याचे आदेश आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -