
रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘विस्फोट’ ( Visfot ) हा हिंदी थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कूकी गुलाटी यांनी केलं असून नुकताच याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.
‘विस्फोट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका प्रिया बापटने साकारल्याचं स्पष्ट होत आहे. एकीकडे बायकोचं बाहेर अफेअर अन् दुसरीकडे किडनॅप झालेला मुलगा, या दोन्ही गोष्टींतून हिरो मार्ग कसा काढणार याचा उलगडा ‘विस्फोट’ ( Visfot ) या चित्रपटातून होणार आहे. याशिवाय फरदीन खान साकारत असलेल्या पात्राच्या आयुष्यात देखील अनेक चढउतार येत असल्याचं या चित्रपटात पाहायला मिळतंय.
https://www.instagram.com/reel/C_aPVLpivaR/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
‘विस्फोट’ ( Visfot ) हा चित्रपट ‘रॉक, पेपर, सिजर्स’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा रिमेक बनवला आहे. येत्या ६ सप्टेंबरला जिओ सिनेमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, रितेश देशमुख व फरदीन खान यांची जोडी ‘हे बेबी’ या चित्रपटानंतर ‘विस्फोट’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. याशिवाय रितेश अन् प्रिया देखील एकत्र झळकणार असल्याने मराठी प्रेक्षकांनी सुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.