मुंबई: आजकालच्या लग्नांमध्ये नवरा-नवरीची होणारी एंट्री ही पाहण्यासारखी असते. अनेकजण यासाठी हटके आयडिया शोधून काढत असतात. अशीच एक हटके एंट्री सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही लग्नांमध्ये फिल्मी स्टाईल नवरा-नवरी एंट्री करतात तर काहीजण फुलांच्या वर्षावात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत नवरा-नवरीने वेगळ्याच अंदाजात एंट्री घेतली आहे. बुलेटवरून नवरा-नवरीने एंट्री घेतली आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये लग्नसोहळ्यात नवरा-नवरीची एंट्री दाखवली आहे. यात हैराणजनक म्हणजे नवरा-नवरी एकत्र वेगवेगळ्या बुलेटवरून एंट्री घेताना दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा अशी एंट्री पाहिली आहे ज्यात नवरी बुलेट चालवत आहे. नवरीचा आत्मविश्वास पाहून मला चांगले वाटले. वाह मेकअप..
व्हिडिओमध्ये नवरा-नवरी गेटमधून बुलेट चालवत एंट्री करताना दिसत आहे. तसेच बाजूला उभे असलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये मै तो हारी रे हारी रे…हे गाणे वाजत आहे.