हडपसरमध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनजेरची निर्घृण हत्या, तर नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात एका फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक वासुदेव कुलकर्णी (Vasudev Kulkarni) यांची मध्यरात्री निर्घृण हत्या (Pune Crime) करण्यात आली. ते शतपावली करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेच्या काही तास आधी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. १२ तासात दोन खून झाल्याने पुणे हादरले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या १२ तासांत दोन खुनाच्या घटनांनी पुण्यात खळबळ उडाली आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Pune Crime) वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल रात्री त्यांच्या नाना पेठेतील कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
त्यानंतर रात्री हडपसर परिसरात वासुदेव कुलकर्णी यांचा खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
दरम्यान, या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. वासुदेव कुलकर्णी यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
दरम्यान, पुण्यातील या घटनांमुळे शहरात सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळण्याचे आवाहन केले आहे.